हरवल्या पायवाटा
हरवल्या पायवाटा जेव्हा नव्हत्या इंधन गाड्या तेव्हा गांव जरी खेडे होता पायाखालच्या पायवाटेला लाल तांबडा रंग होता वार्यासोबत झुलत्या झाडांना मातीचा गंध होता सापशिडी वळणाच्या झाडी, झुडपातील कांटाकुट्यातील पायवाटा तुडवण्यात आनंद होता साकवारुन मिरवतांना खळखळणारे ओढे ओढ्यातल्या गारगोट्या खेकडे,चिंबोऱ्या निरखतांना कोस,मैलांचा शीण जात होता सड्यावरील कडे कड्यावरील करवंदे करवंदांची झुडुपे वारूसंगे हेलावणारे काळे निळे झुपके …