खिडकी

एक झुळूक सुगंधाची

जेथून येई अलवार

कप्पा आठवणींचा

उलगडी, जी हळुवार

जी देते, जगण्याची आशा

बोलती, स्वप्नांचीचं भाषा

अशी जागा, जेथे व्हावे निवांत

मनात रुंजी घालतात, विचार शांत

मिळे इथेच क्षणभर विश्रांती

आनंद मिळे, येथे दिवसांती

आपल्याच आपल्याशी संवाद घडतो

मळभ दूर होऊन, गत जीवनाला जोडतो

एकांतात विनते, अनंत प्रेमाचे धागे

रोजची धावपळ, सोडून देती मागे

आजच्या युगात जपून ठेवते

ही, भावनांची दिडकी

नेहमीच उघडून बसावं

अशीही छोटीशी, पण मोठी

खिडकी……………..

संदिप काजळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: