माझा विठू सावळा
तुझ्या मंदिरात कधी मी आले नव्हते ….पणं
माझ्या हृदयाला मी हरी मंदिर
बनवले होते …..
विठ्ठल विठ्ठल
तुला मनात पुजतांना काही
न मागता मस्तक झुकविले होते
हेच सर्वांना शिकविले होते ….
विठ्ठल विठ्ठल
तुझ्या मंदिरात प्रवेश करताना
दोन कर जोडले होते …पणं
माझ्या हरी मंदिरात मी
टाळ मृदंग वाजविले होते …..
विठ्ठल विठ्ठल
तुझ्या भक्तीचा झरा
वाहत होता माझ्या हृदयात
म्हणूनच हरवले होते मी
तुझ्या भजनात ……
विठ्ठल विठ्ठल
तुझा आशिर्वाद आणि प्रेम
सतत माझ्या सोबत होते
तेच तुझी शक्ती बनून
मला यशस्वी करत होते …..
विठ्ठल विठ्ठल
तू विठेवर उभा हेच रूप हृदयात साठविले होते
आणि हेच रूप मनी
दाटले होते ……
विठ्ठल विठ्ठल
शुभम येरुणकर