टाईमपास 3 चा टीजर आणि ट्रेलर व काही गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच टाईमपास 3 चे गाणे याच्या रिक्षाच्या हॉर्नमध्ये आली वाघाची डरकाळी , या गाण्याने सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. टाईमपास चित्रपटच्या पहिल्या भगत मला वेड लागले प्रेमाचे , ही पोरी साजूक अश्या दमदार गाण्यांनी चित्रपट सुपरहिट केले आहे. आणि आता टाईमपास 3 चे गाणे देखील दमदार पद्धतीने झाले आहे. वैशाली सामंतच्या ठसकेबाज आवाजाचा तडका आणि कृतिका गायकवाड हिच्या अदांनी हे गाण दमदार एकायला येत आहे.
टाईमपास चित्रपटच्या पहिल्या भगत देखील अभिनेता प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांनी उकृष्ट अभिनय करून सर्व प्रेक्षकांना वेड लावले होते. या भागात देखील प्रथमेश परब धमाल करणार असून हृता दुर्गुळे सोबत असणार आहे. रवी जाधव यांचे दिग्दर्शन असणार आहे. येत्या 29 जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून चित्रपट प्रदर्शित होत आहे. या सोबतच झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती आहे. टाईमपास 3 चित्रपटाची तारीख जशी जशी जवळ येत आहे त्या प्रमाणे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढत आहे.