तिला काही सांगायचंय
कित्येक दिवसांचं साठलंय
मन आतल्याआत गोठलंय
सगळ्याच वाटा झाल्या बंद
दरवळत नाही फुलांचा गंध
आशेचा दिवा घेऊन फिरत आहे
स्वतःच्या भावनांना, फक्त मिरवत आहे
प्रश्नच जणू वाटे आयुष्य संपूर्ण
कितीही शोधले, तरीही काही
उत्तरं अपूर्ण
सुख शोधत आहे, तिचा प्रत्येक क्षण
वाळवंटी विचारांनी, नशीब
झाले रण
मोहोर आयुष्याचा गळून पडला
तिच्या वेदनांनी मारवा ही
रडला
लिहावेसे वाटते, पण शब्द हे
घरंगळले
जणू अववबे गगनचं, गंगेत
वितळले
दाटलेलं सगळं पानांवर मोकळं करायचंय
थांबा, ऐका…….
तिला काही सांगायचंय
तिला काही सांगायचंय
संदीप काजळे