सूर्यपुत्र कर्ण
सूर्यपुत्र असून ही
अंधारात वाढला होता
कुंतीच्या चुकीमुळे तो
सूतपुत्र बनला होता
कुंती पुत्र असून हि
भाग्याचा कर्मवीर होता
धर्मी असून ही तो
साथ अधर्माची देत होता
कवच कुंडल असून ही
सूर्या सारखा चमकत होता
दुर्योधनंचा मित्र असून तो
पांडवांचा मोठा भाऊ होता.
सत्याचा साथीदार तो
हृदयाचा दानवीर होता
कवच कुंडल दान करून
दानवीर तो बनला होता
सूर्याचे तेज असुनी
राग अग्नी समान होता
धनुर्विद्या मध्ये पारंगत असून
हात न त्याचा कोणी धरला होता
ब्रम्हविद्ये साठी बनला
परशुरामाचा शिष्य होता
निः शस्त्र असताना
मृत्यू मुखी पडला होता
नियतीने घात घातला
अर्जुनाने बाण सोडला
धारा तिर्थी तिधेच पडला
असा हा सूर्य पुत्र कर्ण
इतिहासात होऊन गेला
मेघा शहा