शहरात रमेना मन
शहरात रमेना मन
येई गावची आठवण
नजरेत वाहती नदी
काठावर हिरव्या झाडी
ग्रीष्माने तापल्या गवताची
सोनेरी झाली कात
हळुवार झुळुक येता वाऱ्याची
वाहते सोने होई भास
सरला अंधार झाली प्रभात
तरीही सरेना
रातकिड्यांची किरकीर्र
शेजारी वाहे नदी झुळझुळ
मिसळीत त्या सुरातसूर
ऐकता गान कोकीळेचे
मनास येई उभारी
वृक्ष न्याहाळी पडछाया
विसरून दुनियादारी
निळेशार रूप सरीतेचे
भासे मनास भारी
त्या मोकळ्या अवकाशात
मन अजूनही घेते
उंच भरारी
मधुकर भिवा जाधव