2,124 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas साथ तुझी जीवनात साथ तुझी महत्वाची खूप असते जग जाहीर करून ती सांगायची नसते सगळ्यांच्या आधी आपण समजून घ्यायचे असते अर्ध्यावर मात्र सोडून असे जायचे नसते प्रेम केले आहेस तर असे झिडकारायचे नसते घरदार सोडून आले तझ्याकडे उघड्यावर टाकून जायचे नसते प्रसंगाला हिमतीने सामोरे जाऊन सत्य परस्थितीला डावलायचे नसते यालाच तर प्रेम म्हणायचे असते मेघा शाह