सांग कधी बोलायचं
सांग कधी बोलायचं वाऱ्यावरी डोलायच
मन मोकळं होण्यासाठी मौन कधी तोडायच
एक पाखरु येऊन गेलं, मला गाणं देऊन गेलं
येतो म्हंटल आल नाही,तुझ्या सारखच त्यानं केलं
आत गाणं घुसमटलय, सांग कधी बोलायचं
किती हका देऊन झाल्या,काळजाच्या पार गेल्या
मौनाचे हे वार झेलीत डोळ्यांमधल्या धार झाल्या
हट्टी तार कळजामधली तिला कधी छेडायच
सांग कधी बोलायचं
तोडून ही तुटत नाहीत,असले कसले धागे
पुढे चालतो मी तरी, ओढत जातात मागे
आदृष्य काही मनात उरलय
त्याला का कधी तोलायच
सांग कधी बोलायचं
मेघा शाह