नूर पहिल्या पावसाचा

नूर पहिल्या पावसाचा

सुन्या डोंगरावरून आले
मेघ जळाने भरून आले
अंग कसे गोंडस धारांनी
मातीचे मोहरुन आले

थेंबाशी बोलतात पक्षी
भिजतांना डोलतात पक्षी
गाऱ्यामधले कोंब कोवळे
चोचीने सोलतात पक्षी

ढोल चिंब वाजतात धारा
पानांवर नाचतात धारा
छता छताला भेट देऊनी
मातीवर साचतात धारा

धारा देखणी करतो पाऊस
हिरव्याराणी चरतो पाऊस
नक्षत्रांच्या पायघड्यांना
सुर निळे अंथरतो पाऊस

पहिला पाऊस नूर वाटतो
आनंदाचा पुर वाटतो
झाडांसाठी पावलेला
मेघांचा मजकूर वाटतो

गो. शि. म्हसकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: