पुढे चालत राहायचं ...
जर तुम्हाला कोणाचा त्रास होत असेल,
तर त्या व्यक्तीला दोष देऊ नका,
स्वतःला देखील देऊ नका,
कारण नशीब समजायचं , आणि समजता समजता आणि
पुढे चालत राहायचं ….
पुढे चालता चालता मागचा भूतकाळ तुम्हाला आठवेल
पण कधीतरी त्याच आठवणीत जगून मात्र पाहायचं
आणि पाहता पाहता पुढे चालत रहायचं
प्रेमाच्या गप्पा, ठरवलेले प्लॅन्स, काही गिफ्ट,
हे कपाटातून काढून पाहून मात्र रमायच,
आणि रमत गमत पुढे मात्र चालत रहायचं
पुढे चालताना तुम्हला एकटेपनाही वाटेल,
पण एकटे वाटत असतांना ,
पुन्हा एकदा तिच्या सोबतीच गाण ऐकायचं ,
आणि ऐकता ऐकता पुढे चालत रहायचं
आता भूतकाळ जरी पूर्ण आठवला तरी वर्तमानात
भविष्य काळाचा विचार मात्र करायचा,
आणि विचार करता करता
पुढे चालत रहायचं, पुढे चालत रहायचं…
लेखक – प्रसाद सोनवणे