पुन्हा एकदा ऐतिहासिक वातावरण होणार , ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात

पुन्हा एकदा ऐतिहासिक वातावरण होणार , 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात

मराठी चित्रपट सृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळत आहे. नुकतेच जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई” या ग्रंथावर आधारीत आहे. औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई होत्या. यांच्या जीवनावर आधारित चित्रपटची कथा आहे. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत चित्र नगरीत भव्य सेट उभारण्यात आलेला आहे.

‘प्लेनेट मराठी’ चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि मंत्रा व्हीजन यांची निर्मिती आहे. चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत सोनाली कुलकर्णी असणार आहे. या चित्रपटची कथा , पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत. तसेच राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाबद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”जेव्हा पासून हा चित्रपट येतोय अशी घोषणा केली तेव्हा पासूनच तांत्रिक टीम पासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटासाठी स्वतःला झोकून दिले आहे. इतक्या दिवसाचं अभ्यास, वर्कशॉप , प्री वर्क, ही सर्व तयारी केल्यानंतर अखेर हा चित्रपट चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. सेटवर येण्याआधी सगळ्याच टीमने आपापल्या विभागामध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, हा चित्रपट सर्वोत्तम कसा करता येईल, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम या विषयाला आणि चित्रपटाला योग्य न्याय देतील, यात शंका नाही. मला आनंद आहे की सोनाली सारखी गुणी अभिनेत्री ही मुख्य भूमिका साकारणार आहे. धाडस आणि शौर्य यांचे असामान्य असे मिश्रण असणाऱ्या छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश आहे.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: