काय छान दिसता ...
अहो,
तुम्ही काय छान दिसता
फक्त पगार कमी आहे
नाहीतर तुम्हीही रुबाबदार
दिसला असता ।।
आमचेही एक घर आहे
पत्नी आहे, मुले आहेत
त्यांचे कपडे आहे, दवाखाना आहे
आमची जबाबदारीही तशीच आहे
कामात काम काय
तर क्लास फोर अधीक्षक हाय
नौकरी आमची डौलात
पण पाय आहे खोलात
आणि तरीही,
अहो,
तुम्ही काय छान दिसता
पण फक्त पगार थोडा कमी हाय
नाहीतर तुम्हीही रुबाबदार
दिसला असता ।।
आमच्याही घरात तेच
भांड्याला भांडे लागते
काय करणार त्यात
दोन संसार आमचे
दोन्ही भांडे जोरात वाजते
बायको रुसते तीही फुगते
मुलं रडते तेही मागते
कुणी नाही वाली आम्हा
तरीही स्वतःचे मन मारून
सगळ्यांची मन राखता ।।
आणि तरीही
अहो,
तुम्ही काय छान दिसता
फक्त पगार थोडा कमी हाय
नाहीतर तुम्हीही रुबाबदार
दिसला असता ।।
तुम्हीही रुबाबदार दिसला असता ।।
प्रकाश बडगुजर