बंधने
स्वतःलाच घातलेली सारी बंधने
आज स्वतःच तोडू म्हणते
मनास जिवंत ठेवण्यासाठी
भावनांचा ओलावा देवू म्हणते
आजवर गमावले त्याचे
हिशेब मांडू म्हणते
चुकलेल्या जिवनांचे गणित
पुन्हा सोडवू म्हणते
कोंडून ठेवलेल्या प्रत्येक ईच्छां
वाऱ्यापरी वाहू पाहते
समाजाला घाबरून खूपदा
त्यालाच घाबरवू म्हणते
हिरमुसलेल्या मनाला
जगण्याचे बळ द्यावे म्हणते
सऱ्यांच्या मुलाहिजा राखत
स्वतःलाच स्वतः भेटू म्हणते
आसुसलेल्या माझ्या गळ्याला
मीच मिठी मारू म्हणते
स्वतः ला घातलेली बंधने
स्वतः तोडू पाहते
मेघा शाह