अर्थ आयुष्याचा 1,414 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas अर्थ आयुष्याचा कुणा कुणाला भार वाटतेजीवन मज रविवार वाटते कसा शिरू हृदयात तुझ्या मीबंद मनाचे दार वाटते तू भेटाया आली म्हणजेउन्हाळ्यातही गार वाटते जरी बोलते तू अदबीनेतलवारीची धार वाटते दुःख एवढे भाग्यवान कीसुख आता भंगार वाटते अर्थ शोध तू आयुष्याचाप्रेम हेच मज सार वाटते गो. शि. म्हसकर