कविता अशी असावी
अशी ती कविता असावी
पोटातून ती निघावी
रचून ती हृदयात व्हावी
साठा करुनी मेंदूत ठेवावी
सरस्वतीची कृपा व्हावी
गोड वाणीवर ती यावी
शब्द रुपी ती बाहेर पडावी
लेखणीतून ती कागदावर यावी
हृदयाला हृदयाशी जोडता यावी
भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी असावी…….
कोणाची तरी भुक असावी
कोणाची तृष्णा असावी
गरिबांची असावी अन् श्रीमंतांची असावी
लहान असावी,मोठी असावी
पण ती,..,…..
सकल जनसमोर प्रस्तुत व्हावी
कौतुकानी पाठ थोपटून घ्यावी
पारितोषिकाची तव पावती असावी
अशी ती कविता असावी
मेघा शाह