जखमा
दिलदार मैतराने, जपली नाती म्हणून..
पाठीत वार केला, हृदयी ती होती म्हणून..
झाला असाही तर्क, डाव त्यानेच उधळला..
जाऊनिया मिळाली, त्यालाच ही छाती म्हणून..
वाद कोणताच नाही, ना रुसण्याचा पुरावा..
तो लाजला मिठीने, दिसला सुरा हाती म्हणून..
आत चंद्र पौर्णिमेचा, स्मित हास्य देत होता,
बेफिकीर तो ही, होता काळोख राती म्हणून..
केलाच नाही गर्व, कधी आनंद वाटल्याचा,
ती ही मुकीच होती, केला साज ओठी म्हणून..
वणव्यात पेटलेले, माझे खुशाल घरटे,
वाचवू न शकलो, झाली घट्ट मिठी म्हणून..
काळजा मध्येही जखमा, आतून होत होत्या,
ते कोळसे निघाले, जे मानले मोती म्हणून..
सुरज खंडारे