हर हर महादेव चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मराठी सिंनेसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. नुकताच हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणार्या या भव्य दिव्य ऐतिहासिक सिनेमाची सर्वत्र चर्चा होत असून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
यात सध्या हर हर महादेव या मराठीसोबत बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणा-या भव्ययदिव्य ऐतिहासिक सिनेमाची खुप चर्चा रंगलीय. अभिनेता सुबोध भावे यात शिवछत्रपतींच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या करारी भूमिकेत पाहायला मिळतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलसेनेच्या असामान्य पराक्रमाची शौर्यगाथा या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.निकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून देखील याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिजित देशपांडे लिखित दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सुबोध भावे, शरद केळकर यांच्यासह अमृता खानविलकर, हार्दिक जोशी, सायली संजीव हे कलाकार मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील.