दूर देशाचा रावा
वाट त्याची पाहता
आला कंठाशी प्राण
अभिमान, माझा तोच
तोच माझी शान
माझ्या स्वप्नांचे दीप
त्याने मालवून टाकले
स्पर्शासाठी आसुसलेले
मन, आठवणींनी झाकले
त्याच्या विरहाचा जणू
सर्वत्र अंधार दाटला
क्षणाक्षणांचा अनवट
मोह उरात साठला
कसे सांगू आता
दुःखात मी जळते
त्याच्याच स्वप्नांत
माझे जगणे ढळते
काहीच न सांगता तो
निघून का गेला असा
जणू प्राण या देहातून
मार्गक्रमण करतो जसा
त्याच्या यातनांचा
अष्म कसा मी सहावा
निरोप साधा नाही आणला
तो, दूर देशीचा रावा
संदीप काजळे