कोरोनातले मरण
हरवलीय कवीता,
भिक मागतांना कुठं दिसते कां
खळगी भरायला पोटाची,
शरीर विकायला बसते कां
कसरत करीत,
दोरी उड्या मारणारी,
ढोल बडवीत,
पदराने घाम पुशीत,
गर्दीत शिरुन.
दे माय पोटासाठी म्हणत,
पदर पसरीत,
आता गर्दीत,
घुसते कां
पाटे गेले मिक्सर आले,
पाटेवाल्यांचे दगड झाले,
अर्धनग्न देह घेऊन,
खळगी पोटाची भरण्यासाठी,
अड्ड्यावर ती बसते कां?.
घंटानाद हरवले, मंदिरातले.
ओसाड देवालये,
पोथ्या कुराणे संपली कां
भिक्षुकीवर जगणाऱ्यांच्या,
खाज बुडाची बुझली का
नारे लावणार्या नार्यांची,
लक्तरे वेशीवर झुलत आहेत.
शेतात उभ्या पिका ऐवजी,
मुडद्यांचे मळे डुलत आहेत.
कर्जाच्या अर्जावर ,
पद्द्याचे बोल रुजत आहेत.
‘अधिं मरण अमरपण ये मग ते,
मरणांत खरोखर जग जगते”
हरवली कवीता,
भिक मागतांना, दिसते कां
मधुकर जाधव