बिघडले कुठे
कुठे बिघडलं एकदा म्हंटल
नेशील का रे फिरायला
रोज रोज घरची कामे करून
जीव लागतो थकायला
माहेर सोडून सासरची
शिकले नाती जोडायला
सर्व सण आणि चालीरीती जपायला
कुठे बिघडलं हट्ट केला
पार्टनर हवा समजून घ्यायला
आणि समजून सांगायला
रांधा वधा उष्टी काढा
जीव जाई थकून भागून
एकदा तरी त्याने पुसावं
येतेस का थोडा वेळ बसायला
कुठे बिघडलं एकदा म्हटल
नेशील का रे फिरायला
निवांत एका ठिकाणी
क्षणभर बसून
हळूच हात हातात धरून
मनातलं काहीतरी बोलायला
एवढासा गजरा केसांत मळायला
आणि एकच ओली भेळ
दोघात मिळून खायला
शिकले आहे मीआता
एवढ्यातच समाधान मानायला
नको का द्यायला वेळ त्याने
एकमेकांना समजून घ्यायला
कोठे बघडल एकदा म्हंटल
नेशील का रे फिरायला
मेघा शाह