728 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas भास तुझा भास होतो क्षणा क्षणाला जीव माझा लागतो पणाला तू आहेस का नाहीस हे ठाऊक नाही मजला तुझ्या आवाजाचा भास पडतो कानी तुझं नाव कोरल माझ्या मनी तुला शोधत असते नजर माझी सापडेल का प्रतिमा तुझी स्वप्नी तुझी दिसते मुरत चेहरा तुझं दिसतो पुसट स्वप्न माझे खरे कधी होईल भेट तुझी कधीतरी होईल एक दिवस यावा असा भास तुझा तो नसावा खरंच तू यावा आणि भास तुझा मला वाटावा सौ. मेघा शहा