आशेचे किरण

पक्षी आकाशात हिडतांना त्यावेळी वाटा नसतात. प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट स्वता: शोधावी लागते त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवन मार्ग प्रत्येकाला स्वत:च शोधावा लागतो.. स्वप्न अशी गोष्ट आहे की प्रत्येकजण आयुष्यात ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. परिस्थिती माणसाला शिकवते आणि परिस्थितीच नव्याने जगायला अनुभव देते. चला तर मग पाहुयात अश्याच वेड्या स्वप्नांच्या दुनियातला सहावा भाग आशेचे किरण      

आशेचे किरण 

               एक शहरात राहणारे मध्यमवर्गीय कुटुंब होते. त्यांचा रमेश नावाचा मुलगा होता. खरं तर, घराची परिस्थिती जरी गरिबाची असली तरी स्वप्न बघायला मर्यादा राहत नाही. म्हणूनच काहीतरी नवीन करायचं, वेगळं करायचं अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधयला रमेश आता तयार झाला होता. रमेश मॅट्रिक उत्तीर्ण होऊन दुनियादारीच्या जगात जगायला सुरवात केली होती. असे म्हणतात, रात्री झोपेत स्वप्न पाहण्यापेक्षा, उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलेले कधीही सत्यात उतरते. त्याचप्रमाणे रमेश हा वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास दिवस रात्र करू लागला . पण अभ्यास कितीही केला तरी काहीवेळा परिस्थितीमुळे काही स्वप्नंना मर्यादा घालावीच लागते. म्हणून त्याने टेलरिंग दुकान टाकण्याच्या निर्णय घेतला. आयुष्यात माणसाला सर्वे सोंग करता येते पण पैशांचे सोंग करता येत नाही. कारण स्वत:ची भूक भागवण्यापेक्षा आता गरज होती, ती म्हणजे कुटुंबाची भूक भागायला पाहिजे. रमेशचे काही दिवसातच लग्न देखील झाले. खरं तर आयुष्यात जो पर्यत्न कष्ट,संघर्ष, मेहनत करत नाही तो पर्यंत आनंदाचे  दिवस पाहायला मिळत नाही. रमेशने डोळ्यासमोर पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरण्याची वेळ आली होती. कारण पूर्वीच्याकाळी असे म्हणायचे ज्याला सरकारी नोकरी तो सर्वात श्रीमंत माणूस, पण काळानुसार व्याख्या बदलत गेल्या. रमेश असच एकदा फिरायला गेला असतांना त्याला एकेठिकणी नोकरीची जाहिरात वाचायला मिळाली. त्याने लवकर फॉर्म घेतला व त्याठिकाणी भरायला देखील सुरवात केली. रमेशला सरकारी नोकरी करण्याची खूप इच्छा होती. दिवसेंदिवस जाऊ लागले. आता रमेश देखील हळू हळू खचु लागला होता. पण जर मनापासून मागितले तर देवाला देखील देणे भागच आहे. असेच ऐकेदिवशी रमेशचा फोन वाजला आणि त्याला सरकारी नोकरीसाठी मुलाखतीला बोलवण्यात आले. पण कदाचित या वेळेस सुद्धा नशीबाने पाठ फिरवली. असेच बरेच दिवस गेले आणि शेवटी रमेशला देखील सर्वच ठिकाणाहून नकार येऊ लागला.   आता टेलरिंग काम करणे हाच एक अंतिम उपाय होता. पण प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे त्यांची पत्नीने पाठिंबा देऊन पुन्हा एकदा प्रयत्न करून तर पहा असे ध्येय दाखऊन  रमेशने शेवटचे प्रयत्न केले आणि थोड्याच दिवसात त्याला मुलाखतीसाठी देखील  बोलावले आणि लवकरच हजर होण्यासाठी संगितले 

             खर जे स्वप्न पाहण्यासाठी रमेश घाबरात होता आज तेच स्वप्न आपल्या आयुष्याची सर्वे दारे उघडे करून स्वागत करत होते. सरकारी नोकरी म्हंटली तर, त्याठिकाणी सामान्य नागरिक आलेच त्यांची कामे ,त्यांची कागदपत्रे या सरव्या गोष्टींसाठी प्रत्येक सामान्य नागरिकांना फेर्‍या माराव्या लागतात. पण जो व्यक्ति परिस्थितीचा सामना करून आलेला असतो त्याला गरिबीची जाणीव असते. म्हणून  रमेशने देखील ठरवले की, मी जरी आज सरकारी नोकरदार असलो तरी इतर साहेबांसारखे माझे वागणे नसणार, योग्य वेळेत देणे हे माझ सरकारी नोकरदार म्हणून कर्तव्य आहे. आणि आज रमेश जवळ स्वत:ची कार, बँक बॅलेन्स सर्व काही आहे. सांगायच तात्पर्य हेच की, मित्रांनो काहीवेळेस आपण परिस्थितीमुळे खचतो आणि थांबतो. पण एक लक्षात ठेवा की थांबल्या नंतर एका नवीन मार्गाला सुरवात होण्याची तीच एक संधी आपल्याला असते. आणि रमेशचा लिपिक पासून सुरवात  झालेला प्रवास एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यावेळेस झालेली फीलिंग्स तब्बल 15 वर्षानी सत्यात उतरली तर या पेक्षा मोठी फीलिंग्स तरी काय असणार………..                                           

                                                                                – प्रसाद भालचंद्र सोनवणे                                                                                                                                                     

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: