3,038 Comments / कविता, मैफिल / By FilmyPravas अखेरचा श्वास भावनांच्या हिंदोळ्यावर मन हेलकावे घेते जाऊ नको रे दूर पाखरा मन दाटून येते तुजसाठी सारा जन्म वाहिला दिसेनासे तू तर जीव कासावीस झाला तुझ्या नयनांनी पाहिली मी माझी स्वप्ने ऐकून तुझी यशोगाथा सुंदर झाले हे जगणे घेऊन पंखात बळ, घे तू आकाशी झेप परतुनी ये रे पाखरा तूच आधार एक तुझ्या आठवणीने कंठ दाटूनी येतो डोळ्यात दाटल्या या भावनांना पाझर फुटतो अखेरचा हा श्वास तुझ्यासाठी रोखला तुला पाहण्या जीव माझा आतुरला रूपाली शहा