आपणच असतो आपले
आपणच असतो आपले
अगदी अखेरपर्यंत
नुसतं म्हणायचं असतं
आपलं – आपलं संपेर्यंत
आपणच असतं चिंतायच
आपल्यासाठी शुभंकर
आपणच आपल्या जखमांवर
घालायची असते फुंकर
आपणच करावयाची असतात
दारे बंद अमावस्येला
अंधारातून घालावयाची असते
साद आपणच पहाट परीला
आपणच असत विसरायचं
नत दृष्टांच्या शापांना
आपणच शोधायचं असत
सुरातून, फुलातून या
थोपटणाऱ्या चांदण्यांना
आपणच असतो आपल्या
रोख नरकाचे गुन्हेगार
क्षण-क्षण फुलवणारे आपणच
आपल्या सुख स्वर्गाचे कारागीर
आपणच असतो आपल्या
आजन्म अपयाशाचे आकार
आपणच असतो अमर
आपल्या यशाचे वारसदार
आपणच असतो साधक
हे सारे साधणारे
नाहीतर असतो आपणच
आपली सावली गमावणारे
मेघा शहा