आणि काय हवं

सुरू झाले राजा

अन राणीचे राज्य

सुख निरंतर हा

घटक अविभाज्य

नवीन नावलाईचा

सारा हा खेळ

सुख आणि दुःखाचा

जमवूया छान मेळ

विणूया आपण, आपल्या

नात्याची घट्ट अशी वीण

धागा असेल पक्का, तर

नाही होणार ती क्षीण

तुझ्या माझ्यात गुंफले

अनोखे हे रेशीम बंध

दरवळू लागतो चोहीकडे

आपल्याच नात्याचा गंध

एकमेकांसमवेत राहुनि

जपुया हळवे हे मन

अपार प्रेमाची वचनं

हेच असावे आपुले धन

कसोटीच्या काळातही

नेहमीच एकत्र राहू

हातात हात धरुनि

नवीन हे जग पाहू

उलगडू दे नात्यांचा

पदर हा, अगदी अलवार

सजू दे सुखाचे क्षणं

जरा थोडे, हळुवार

हळू हळू होईल आपणांस

ह्या सगळ्याची सवयं

तुझ्या माझ्या ह्या

गोड संसाराला……

आणि काय हवंय

                         संदीप काजळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: