अर्थ आयुष्याचा

अर्थ आयुष्याचा कुणा कुणाला भार वाटतेजीवन मज रविवार वाटते कसा शिरू हृदयात तुझ्या मीबंद मनाचे दार वाटते तू भेटाया आली म्हणजेउन्हाळ्यातही गार वाटते जरी बोलते तू अदबीनेतलवारीची धार वाटते दुःख एवढे भाग्यवान कीसुख आता भंगार वाटते अर्थ शोध तू आयुष्याचाप्रेम हेच मज सार वाटते गो. शि. म्हसकर